अमरावती प्रतिनिधी/ जयकुमार बुटे
स्वराज्य वार्ता न्यूज चैनलने आम्ही काही दिवस आगोदर न्यूज लावली होती त्याचा परिणाम आज प्रत्यक्ष दिसत आहे.
भूतेश्वर जोक ते साईनगर पर्यंत पालखी रोड बनणार होता परंतु नवाथे नगर पर्यंत काम पूर्ण झाले होते त्या समोरील काम अर्धवट बरेच दिवस बसून राहिले होते स्थानिक नगरसेवक तुषार भारतीय यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या वतीने एक मागणी करण्यात आली होती स्वस्तिक नगर पासून ते पुढील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.

बरेच दिवसापासून हे काम राज्य शासनाकडून निधी न आल्याने प्रलंबित होत आज या बाबत चर्चा करून पुढील काम सुरू करण्याचा निर्णय केला,टप्याटप्याने काम पूर्णत्वास जाईल सोबतच कृष्णार्पण कॉलनी व हरियाली जवळील पाईप पुलाच्या कामाला सुरुवात करू. असे आश्वासन तुषार भारतीय त्यांनी दिले.
