स्वराज्य वार्ता ब्युरो रिपोट
दिल्ली:- देशातील ५ राज्याच्या विधान सभा निवडणूकीच्या सन २०२३- २०२४ निवडणूकीचा निकाल आज लागला. अनेक प्रसार माध्यमातून वर्तवलेले एक्सिट पोल हे चुकीचे ठरले असुन ५ पैकी ३ राज्यात भाजपने मुसंडी मारून आपला मोठा विजय संपादित केला आहे. त्यामुळे अजूनही देशांमध्ये पंतप्रधान मोदींची जादू कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
देशातील मध्यप्रदेश, राजस्थान,छत्तीसगड, तेलंगणा, व मिझोराम या ५ राज्यातील विधानसभा निवडणुक अटीतटीची होऊन पार पडली होती. सर्व पक्षाच्या उमेदवारांनी लढाई जिंकण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. या राज्यातील विधान सभा निवडणुकीचा निकाल अखेर आज जाहीर झाला व ५ पैकी ३ राज्यात भाजप पक्षाने मोठी मुसंडी मारून विजय संपादित केला आहे. त्यामुळे देशाचे पंतप्रधान मोदींची जादू अजूनही कायम असल्याचे यावरून स्पष्ट झाले.पुन्हा या राज्यात नमो नमो नारा घुमू लागल्याने अनेकांनी फटाके फोडून, पेढे वाटून विजयाचा आनंद साजरा केला आहे.
२०२४ ला लोकसभा निवडणूक होणार असल्याने या ५ राज्यांच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू व प्रभाव अजूनही मतदारांवर असल्याचे या निवडणुकीतून अधोरेखित झाले आहे. कलम ३७०, श्रीराम जन्मस्थान मंदिर, राष्ट्रीय महामार्ग, पंतप्रधान ग्राम सडक, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतागृहे, उज्वला योजना, जनधन योजना, मुद्रा योजना, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर, केदारनाथ कॉरिडॉर तथा इतर अनेक धाडसी निर्णयांचा प्रभाव जनमानसावर असल्याचे यातून दिसून येते. या ५ विधानसभा निवडणुकांमुळे विरोधीपक्षांना मात्र चिंतन करावे लागणार हे नक्की.