प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्य नगरीतील आळंदी येथील कार्तिकी वारी येत्या 8 डिसेंबरला येत असून प्रशासनाकडून त्याची जय्यत तयारी केली जात आहे.त्यामध्ये तालुक्यातील आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधेचा कशाप्रकारे देण्यात येतील याची आढावा बैठक आज आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात पार पडली.
यामध्ये आळंदी नगरीत कार्तिकी यात्रेला वारकऱ्यांसाठी एकुण बुथ,त्यासाठी लागणारे मनुष्य बळ,निवास व्यवस्था,हाॅटेल तपासणी,पाणी शुद्धीकरण
ज्यादा रूग्णवाहीका,औषध मागणी, कंट्रोल रूम
आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.तसेच याचे बाबीचे सर्व नियोजन करण्याच्या उपसंचालक यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीला आळंदी यात्रा नियोजन करण्यासाठी
माननीय उपसंचालक डॉ राधा किशन पवार, आणि
माननीय सिव्हील सर्जन डॉ नागनाथ यमपल्ले,यावेळी पं.स खेड,तालुका आरोग्य अधिकारी
कार्यालय स्टाफ,तसेच ग्रा रु आळंदी येथील डाॅ वणवे व इतर कर्मचारी उपस्थित होते.