मा.न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ...

ब्युरो रिपोर्ट.. स्वराज्य वार्ता..

दिल्ली :- मा.न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) न्यायमूर्ती चंद्रचूड यांना शपथ दिली. पुढची दोन वर्षे ते या पदावर राहणार आहेत.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड १९७८ ते १९८५ या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले._

पुण्यातील कन्हेरसर हे न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे मूळ गाव आहे. न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड हे न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांची जागा घेतील. न्यायमूर्ती उदय ललित यांनी ११ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांची उत्तराधिकारी म्हणून शिफारस केली होती. न्यायमूर्ती चंद्रचूड यांना जून १९९८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याच वर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते २९ मार्च २००० ते ३१ ऑक्टोबर २०१३ या कालावधीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे घटनापीठाचा भाग आहेत. त्यानंतर त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली.

_ऐतिहासिक निकाल देणार्‍या अनेक घटनापीठांसह सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठांचा ते भाग राहिले आहेत. यामध्ये अयोध्या वाद, आयपीसीच्या कलम ३७७ अंतर्गत समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी ठरवणे, आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे, शबरीमाला प्रकरण, भारतीय नौदलात महिला अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी अधिकार देणे आदी निर्णयांचा समावेश आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या पदामुळे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याला एक मानाचा तुरा उंचविण्यास मोठा सन्मान प्राप्त झाला आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!