शिवसेनेचे प्रकाश मारोटकर पॉइझण घेऊन पोहचले कार्यालयात
तीन दिवसांत विज पुरवठा सुरळीत करण्याच्या लेखी अश्वासना नंतर आंदोलन मागे
नांदगाव खंडेश्वर/प्रतिनिधी ओम मोरे
नांदगाव खं.तालुक्यातील कृषी पंपाला विज पुरवठा करणारे अनेक रोहित्र बंद असून व दिवसाला आठ तास सुरळीत विज पुरवठा मिळत नाही तेव्हा ही समस्या घेऊन शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांनसह चक्क पॉइझनची बॉटल सोबत घेऊन शेकडो शेतकऱ्यांनसह विज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक देऊन चार तास ठिय्या आंदोलन केले शेतकऱ्यांनि नारेबाजी करत आक्रोश व्यक्त केला तेव्हा तीन दिवसांत कृषी पंपाचा वीज पुरवठा पुरवठा सुरळीत सुरळीत करण्यात येईल अशे लेखी अश्वासना मिळाल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

रब्बी हंगामाला सुरवात झाली असून शेतकऱ्यांनि गहू व चना पेरणी केली असून १५ दिवसाचा कालावधी होत असताना तालुक्यातील अनेक रोहित्र बंद आहे यापूर्वी सुद्धा शिवसेनेने रब्बी हंगामा पूर्वी कृषी पंपाचा विज सुरळीत करावा अश्या मागणीचे निवेदन दिले होते.
मात्र सहाय्यक अभियंता प्रफुल चितोळे यांनी दुर्लक्ष केले मात्र शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनि शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात विज वितरण कंपनीचे कार्यालयात धडक दिली व तात्काळ बंद असलेले रोहित्र दुरुस्त करण्यात यावे दिवसाला आठ तास सुरळित विज पुरवठा द्या अश्या मागण्या रेटून धरल्या शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या विज वितरण कंपनीचा निषेध सुद्धा शेतकऱ्यांनि केला वरिष्ठ अधिकारीच्या उपस्थितीत लेखी आश्वासन दिल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने अखेर आंदोलन स्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले वरिष्ठ अधिकारी अधीक्षक अभियंता खानंदे कार्यकारी अभियंता आलेगावकर व उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी ३ दिवसांत बंद रोहित्र दुरुस्ती करण्यात येईल व दिवसाला आठ तास विज पुरवठा देण्यात येईल अशे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले .
