पुणे :- महावितरण कंपनीकडून ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल पाठवण्याचे प्रकार चालू असताना आता चक्क शेतकऱ्याला बोगस रिडिंगचे बिल पाठवून लूटमार महावितरण कंपनीकडून केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रासे गावातील नियमित बिल भरणाऱ्या एका शेतकऱ्याला घरगुती बिलावर 2 महिने तब्बल 50 KW युनिट रिडींग जास्त बिलात वाढून आल्याने महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.त्यामुळे अशी बोगस बिले पाठवून शेतकऱ्यांची लूटमार केली जात आहेत.

महावितरण कंपनीकडून कोरोना काळात मीटर रिडींग घरोघरी जाऊन घेणे बंद केले होते. यावेळी कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना देखील अनेक अंदाजे बिले ,व मीटर रिडींग पाठवून महावितरण कंपनीला अनेक ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परंतु आता कोरोना काळ संपल्यानंतर महावितरण कंपनीने नेमणूक केलेल्या कंत्राटी कर्मचारी घरोघरी जाऊन मीटर रिडींग घेऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांचे समाधान झाले आहे,परंतु या हलगर्जी कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांची बोगस रिडींग घेऊन बिले पाठवण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.असाच प्रकार खेड तालुक्यातील रासे गावात घडला. गावातील श्री बबन किसन शिंदे या शेतकऱ्याला महावितरण कंपनीच्या सलग 2 महिने चुकीचे रिडींग बिलावर वाढून आल्याने धक्का बसला आहे.चालू रिडींग व मागील रिडींग यामध्ये 50KW युनिटचा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विज बिलात तिप्पट वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.महावितरण कंपनीकडून घरोघरी जाऊन मीटर रिडींग घेऊन देखील बोगस बिले शेतकऱ्यांना पाठवली जात असून लूटमार सुरूच आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग व गावातील नागरिक संतापले आहेत.घरोघरी मीटर रिडींग घेऊन देखील ग्राहकांना विजबिले,रिंडिंग वाढवून येतातच कशी???असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
अशा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी वर्गावर महावितरणचे मुख्य अभियंता काय कारवाई करणार?? का त्यांना पाठीशी घालणार हेच पाहावे लागेल.