पुणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२२ चे पुण्यामध्ये दिमाखात उद्घाटन…

प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- “समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ग्रंथ चळवळ महत्वाची आहे. ग्रंथात संपूर्ण जीवन बदलण्याची क्षमता असल्याने डिजीटल क्रांतीच्या युगातही नवे ज्ञान संपादन करून व्यक्तिमत्व विकसीत करण्यासाठी ग्रंथ वाचन गरजेचे आहे”, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्या हस्ते मनपा भवन येथून ग्रंथ दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. बालगंधर्व मंदीर चौक मार्गे पुढे पंडीत जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन, घोले मार्ग, शिवाजीनगर येथे या ग्रंथदिंडीचा समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे सर्व संचालक, विविध तालुक्यातील ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह बाजीराव रोड येथील नूतन मराठी महाविद्यालय आणि गुरुवार पेठ येथील सेंट हिल्डाज् माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डॉ. देशमुख म्हणाले, “ग्रंथ हेच खऱ्या अर्थाने ज्ञानाचे वाहक आहेत. पुण्याच्या सांस्कृतिक विकासात ग्रंथ चळवळीचे मोठे योगदान आहे. एखाद्या गोष्टीकडे तंत्रशुद्ध पद्धतीने, चिकित्सक वृत्तीने बघण्याचे ज्ञान ग्रंथामधून मिळते. आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी ग्रंथ वाचनाशिवाय पर्याय नाही. ग्रंथोत्सवामुळे वाचन संस्कृती विकसित होण्याबरोबरच ग्रंथाविषयी रुची निर्माण होण्यास मदत होईल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा ग्रंथोत्सवाचा समारोप बुधवारी सायंकाळी 4 वाजता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सकाळच्या सत्रात 11.30 वाजता ऋचा थत्ते यांचा ‘सुचलेलं काही…वेचलेलं काही’ हा कार्यक्रम होणार आहे. तर अर्पणा निरगुडे आणि अजित कुंटे यांचे कथाकथन होईल. तसेच बालप्रवचनकार हभप. चैतन्यमहाराज थोरात यांचे दुपारी 3 वाजता ग्रंथविषयी प्रवचन होणार आहे. ग्रंथ प्रदर्शन व विक्री बुधवार 16 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत सुरू राहणार असून यात विविध विषयांच्या पुस्तकांसोबतच शासकीय प्रकाशनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, शासकीय विभागीय ग्रंथालयाचे ग्रंथपाल सुरेश रिद्धीवाडे, सहायक ग्रंथालय संचालक अर्चना काळे, कवी विसुभाऊ बापट, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार, तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के, खेड तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर आदी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!