प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड आळंदी विधानसभेची जागा अजित पवार गटाला गेल्याने नाराज झालेल्या महायुतीतील शिवसेनेचे इच्छुक उमेदवार अक्षय जाधव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज आज दाखल केला, यावेळी तालुक्यातील हजारो तरुण कार्यकर्ते व महिला, व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यामुळे खेड आळंदी विधान सभेत महायुतीला खिंडार पडले असुन येणाऱ्या काळात अजित पवार गटाच्या उमेदवाराला एकट्याने निवडणुकिला सामोरे जावे लागणार आहे.तसेच आज अक्षय जाधव यांनी आपले जोरदार शक्तिप्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून, व जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत आज त्यांनी विरोधकांना आपले शक्तिप्रदर्शन दाखवुन दिले.