मृत्यू व्यक्तीची हालचाल ; युक्रेनमधील असल्याचा दावा ; जाणून घ्या त्या व्हायरलं व्हिडिओचं सत्य..

युक्रेनमधील परिस्थितीबाबत खोटं चित्र निर्माण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा हा व्हिडिओ शेअर (व्हायरल) करून केला जात आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात अनेकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जगभरात याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तसंच युक्रेनमधील (Ukraine) अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रहिवाशी भागात होत असलेले हल्ले, बंकरमध्ये बसलेले विद्यार्थी, नागरिक व्यथा मांडताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर काही जुने व्हिडिओ व्हायरल करत त्यासोबत चुकीची माहितीसुद्धा दिली जात आहे. सध्या युद्धाच्या या वातावरणात लोकांकडून ते व्हिडिओ खरे असल्याचं समजूनही शेअर करण्यात येत आहेत. (Russia Ukraine Viral Video Fact Check)

हाच तो व्हायरल व्हिडिओ

आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जातोय की, ‘रशिया (Russia) युक्रेनमध्ये युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह एका ठिकाणी ठेवले आहेत. मृतदेह ठेवलेत त्यातला एक जण जिवंत असून तो आपल्या अंगावर असलेलं प्लास्टिक पूर्ण ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे एक अँकरसुद्धा बातमी सांगताना दिसत आहे.’व्हिडिओमध्ये एक टीव्ही अँकर दिसत आहे. त्याच्या मागच्या बाजूला काही मृतदेह दिसत असून त्यापैकी एक जण जो त्याच्यावर असलेली प्लास्टिक बॅग नीट करताना दिसतो. तो हालचाल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असून सोशल मीडियावर नागरिकांच्या मृत्यूबाबत युक्रेनमधून खोटं पसरवलं जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र त्या व्हिडिओचं सत्य वेगळंच आहे.

खरंतर हा व्हिडिओ युक्रेनमधला नाही तर हवामान बदलाविरोधात करण्यात आलेल्या एका प्रतिकात्मक (demo) आंदोलनातला आहे. गेल्या महिन्यात व्हिएन्नात ४ फेब्रुवारी 2022 रोजी हे आंदोलन करण्यात आले होते. त्यामध्ये एक जर्मनीचा रिपोर्टर मार्विन हा बातमी सांगत आहे. तो जर्मन भाषेत बोलत असल्यानं त्याचा वेगळा अर्थ लावण्यात आला.हा व्हिडिओ जुना आहे युक्रेन मधला नाही हे सत्य.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!