नेरी मिर्झापुर येथे विकास कामाचा भुमिपुजन सोहळा संपन्न

रवि मारोटकर ब्युरो चीफ

आज नेरी मिर्झापुर,, पुनर्वसन येथे बाळाभाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वात नेरी मिर्झापुरचे विकासात्मक तसेच कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापुरुषांच्या स्मारक निर्मितीचा प्रश्न आंबेडकरी समाजाला अस्वस्थ करीत होता.

परंतू आर्वी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री दादाराव केचे यांच्या पुढाकाराने आज
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२१-२०२२ या योजने अंतर्गत गावामध्ये मध्ये बौद्ध विहाराचे बांधकाम किंमत १० लाख रुपये तसेच महीला सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी महिला बचतगटांच्या माध्यमातून महिलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी महीला भवनाचा (मॉल) किंमत १० लक्ष रुपये या कामांचा भुमिपुजन सोहळा २७/०२/२०२२ रविवारला सायंकाळी 5 वाजता आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. दादाराव केचे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर अनुयायी तसेच गावातील शेकडो ग्रामवाशी उपस्थित होते
तसेच प्रमुख उपस्थिती मध्ये. ग्रामपंचायत सचिव राजेश शेंद्रे ग्रामपंचायत नेरी मिर्झापुर उद्घाटक म्हणून लाभलेले आर्वी विधानसभा क्षेत्राचे
आमदार दादारावजी केचे ,राजूभाऊ कदम,
धर्मेंद्र राऊत अशोकबाबू भट्टड ,अशोक तुमडाम
माजी सरपंच पदमाताई मुंद्रे,बाळाभाऊ सोनटक्के
नरेंद्र कोल्हे,प्रशांत कडू,बाबाराव जाधव,बाबारावजी नागदेवते,सुधीर जाधव,आशिष पाटील,विशाल अरस्ड,बंटी कोल्हे,मनीषभाऊ उभाड,उकंडराव भांगे
सौं सविताताई कठाणे,सौं लताताई दांडेकर,सौं वैशालीताई सोनटक्के,सौं जोतीताई नासरे,विजयाताई काळपांड,शोभाताई वाटकर
सविताताई कठाणे,शुभांगीताई तुमस्कर,सिमाताई तुमस्कर,शशिकलाताई सोनटक्के,रुपालीताई भांगे
जयश्रीताई कडू,कल्पनाताई कठाणे ग्रामपंच्यात कर्मचारी शामराव अट्टेल,प्रल्हाद, ठाकरे,पद्माकर बन्सोड,लीलाधर काळकर इत्यादी गावकरी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!