Post Views: 593
अंजनगाव सुर्जी – महेश बुंदे
दिनांक ३ मार्च रोजी पोलिसांना लाखोच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी नवीन बस स्थानक चौकात नाकाबंदी करुन एका चारचाकी वाहनातून लाखो रुपयाचा गुटखा जप्त केला. एम.एच ४६ एन २१५४ या क्रमांकाची झायलो गाडी ही परतवाडा येथून अवैध गुटखा वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली असता पोलीसांनी नवीन बस स्थानक चौकात नाकाबंदी केली.
सदर क्रमांकाची गाडी ही परतवाडा दिशेने अकोटकडे जात असताना तीची तपासणी केली असता त्या गाडीत वाह व पान पराग गुटखा पॅकिट, चेव्हींग तंबाखू पाकिट, विमल पान मसाला पॅकिट, वी वन तंबाखू पॅकिट, प्लास्टिक पन्नीत पान बहार एकूण ३ लाख १ हजार ७५० व झायलो गाडी अंदाजे किंमत ४ लाख असा ७ लाख १ हजार ७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी संतोष गोविंदराम हिराणी वय ३६ वर्ष रा. शिंदी कॅम्प अकोट याला अटक त्याच्याविरुद्ध भादवी कलम १८८,२७२,२७३,३२८, सह कलम अन्न सुरक्षा मानके कायदा अधिनियम २००६ नुसार कलम २६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई ठाणेदार दिपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक गणेश सपकाळ, विजय शेवतकर, विजय निमकांडे, यांनी केली.