अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल,आरोपीस अटक

प्रतिनिधी फुलचंद भगत

वाशिम:-दिनांक ०४/०२/२०२२ रोजी कळमगव्हाण येथिल तक्रारदार यांनी पोलीस स्टेशन शिरपुर येथे तक्रार दाखल केली की, आरोपी नामे विशाल संजय अवताडे वय २५ वर्षे, रा.कळमगव्हाण याने तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी हिस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले आहे बाबत दिलेल्या रिपोर्ट वरुन अप.नंबर ३०/२२ कलम ३६३, ३६६अ भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे तपासात आरोपीचा मोबाईल नंबर हस्तगत करुन त्याचे मोबाईल फोनचे सि.डी.आर. प्राप्त करवुन आरोपीची शोध घेतला असता, नमुद आरोपी हा पिडीता हिस घेऊन आटपाडी, जि. सांगली येथे असल्याबाबत माहीती प्राप्त झाली. सदर खात्रीलायक माहीती वरुन मा. पोलीस अधिक्षक बच्चनसिंह साहेब, यांचे आदेशाने पोलीस स्टेशन स्तरावर एक पथक तयार करण्यात आले.

सदर पथकामध्ये सपोनि महादेव भारसाकळे, मपोहेकॉ संगीता मानकर, पो.कॉ. गजानन डहाळके यांची निवड करुन सांगलीकडे रवाना केले.सदर पथकाने आटपाडी, जि. सांगली येथे जाऊन नमुद आरोपी नामे विशाल संजय अवताडे व पिडीता अल्पवयीन मुलगी यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन शिरपुर येथे येऊन आरोपीस गुन्हयात अटक केली आहे.


पिडीता अल्पवयीन मुलीचे बयाणं नोंदविण्यात आले असुन गुन्हयात कलम ३७६(२)(एन)(जे) भादंवि
सहकलम ४, ८, १२ बालकांचे लैगीक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे वाढ करण्यात आले आहे. आरोपीस रिमांड करीता मा. न्यायालयासमक्ष पेश केले असता, दिनांक ०५.०३.२०२२ पावेतो पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

सदर गुन्हयाचे तपासात मा. बच्चनसिंह सर, पोलीस अधिक्षक वाशिम, मा. गोरख भामरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, वाशिम, मा. सुनिलकुमार पुजारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, वाशिम यांचे मार्गदर्शनामध्ये पो.नि, सुनिल वानखडे, सपोनि महादेव भारसाकळे, मपोहेकॉ संगीता मानकर, पो.कॉ. गजानन डहाळके, पो.कॉ. गौरीशंकर तेलंगे, मपोशि उषा पांडे सर्व पोलीस स्टेशन शिरपुर यांनी महत्वाची भुमिका बजावली आहे. तसेच आरोपीचे मोबाईलचे लोकेशन करीता सायबर पोलीस स्टेशन वाशिम चे अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!