स्वराज्य वार्ता विशेष प्रतिनिधी
पुणे :- खेड आळंदी विधान सभेची जागेची महाविकास आघाडीचा गोंधळ अनेक दिवसांपासून चालू होता. महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक उमेदवार आपली प्रतिष्ठा पणाला लावून आपले वर्चस्व खेड आळंदी विधानसभेच्या जागेवर पणाला लावून होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा नाट्यमय गोंधळ चालू होता. मात्र त्या गोंधळाला आज पूर्णविराम मिळाला आहे.व ही खेड आळंदी महाविकास आघाडीची जागा उबाठा गटाला सुटल्याने तिढा सुटला आहे. त्यामुळे आता या जागेवर इच्छुक असलेले उमेदवार श्री बाबाजी काळे; अमोल पवार व अशोक खांडेभराड यांना कोणाला उमेदवारी मिळणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
एकीकडे महायुतीचे उमेदवाराची जागा अगोदरच जाहीर झाल्याने तिकडे पण बंडखोरी झालेली पहायला मिळाली. काल नाराज झालेल्या शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.मात्र आता महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून चाललेला गोंधळाने तालुक्यातील जनतेमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र हा तिढा आज संपुष्टात आला असुन ती जागा उबाठा गटाला अखेर सुटली आहे. त्या जागेवर इच्छुक असलेले उमेदवार यांना बाकीचे साथ देणार की, महाविकास आघाडीत पण बंडखोरी पाहायला मिळणार???? हेच पाहावे लागेल