दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या नऊ जणांना आळंदी पोलिसांकडून अटक

पुणे वार्ता :- आळंदी-चाकण रोडवर एका हॉटेलसमोर दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या नऊ जणांना आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. या अटक केलेल्या आरोपींमध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे.ही कारवाई बुधवारी (दि. 2) पहाटे साडेतीन वाजता करण्यात आली.

सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड), कलीम बादशा शेख (वय 21, रा. चिंचगव्हाण, ता. माजलगाव, जि. बीड), विलास दत्तात्रय वाघमोडे (वय 24, रा. लक्ष्मीनगर, मोशी), तेजस रवींद्र आल्हाट (वय 21, रा. आल्हाटवाडी, मोशी), योगेश संजय हनुमंते (वय 26, रा. डुडुळगाव, ता. हवेली), वैभव बबन कांबळे (वय 21, रा. भीमनगर, मोशी), रोहित रामदास वाजे (वय 27, रा. सस्तेवाडी, मोशी), विशाल केशवराव जाधव (वय 22, रा. लक्ष्मीनगर, मोशी), काजल दीपक देसाई (वय 24, रा. वडगाव रोड, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई कैलास गर्जे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी-चाकण रोडवर बुधवारी रात्री गस्त घालत असताना हॉटेल रमेश इनच्या समोर लाईटच्या आडोशाला काहीजण संशयितरित्या थांबले असल्याचे आळंदी पोलिसांना दिसले. पोलिसांनी कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एक नकली पिस्तुल, सहा मोबाईल फोन, नंबर नसलेली दुचाकी, एक कोयता, लाल मिरची पूड, नायलॉन दोरी असा दोन लाख एक हजार 155 रुपयांचा ऐवज आढळून आला. त्यावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचे आढळले. पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बापू जोंधळे तपास करीत आहेत.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!