प्रतिनिधी कुणाल शिंदे
“चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू|| होती संताचीया भेटी,सांगु सुख दुःखाच्या गोष्टी”
अलंकापुरीत गर्दीने फुललेले रस्ते
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन दिंड्या घेऊन आलेले वारकरी आज अखेर आळंदीत दाखल झाल्याने अलंकापुरी नगरी वारकऱ्यांनी गजबजून गेलेली पाहायला मिळाली.सगळीकडे भजन, कीर्तन, व हरी नामाच्या गजरात अलंकापुरी नगरी दुमदुमून निघाली होती.त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवनी समाधीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आल्याने मोठी गर्दी झालेली होती.
*मंदिरातील फुलांची आकर्षक सजावट*
दरवर्षी प्रमाणे कार्तिकी एकादशीला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवनी समाधी सोहळा मोठ्या थाटामाटात आनंदाने पार पडला जातो.पहाटे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची महापुजा करण्यात आली. व त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.राज्याच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या वारकरी पहाटे पासूनच दर्शनासाठी रांगेत उभे होते. त्यामुळे आज दिवसभर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली.
इंद्रायणी नदीच्या तीरावर वारकऱ्यांची झालेली गर्दी
तसेच देवस्थान ट्रस्टने या वर्षी देखील मंदिराला व गाभाऱ्यात सुबक आशा फुलांची सजावट करण्यात आली होती. त्यामुळे संत ज्ञानेश्वर मंदिराला एक देखणे रूप भाविकांना पाहायला मिळाले.तसेच इंद्रायणी काठचा परिसर देखील वारकऱ्यांनी गर्दीने फुललेला पाहायला मिळाला. अनेक वारकरी इंद्रायणी नदी काठावर आपल्या दिंडीसोबत भजन, अभंग, फुगड्या,खेळण्यात तल्लीन झालेले दिसत होते. या संजीवनी समाधी सोहळ्याला प्रशासनाने देखील जय्यत तयारी केलेली पाहायला मिळत होती. आळंदी नगरपरिषद, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, पोलीस ,सार्वजनिक बांधकाम विभाग व सेवाभावी संस्था यावेळी वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी तयारीत आहेत.कोणताही अनुचित प्रकार न घडण्यासाठी यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या संजीवनी समाधी सोहळ्याला अजून 2 दिवस अलंकापुरी ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात टाळ मृदुणगांच्या तालावर गर्दीने न्हाऊन निघणार आहे.
माऊलींचे दर्शन घेताना वारकरी