केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री मा. प्रहलाद सिंह पटेल यांच्या शुभहस्ते कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील पश्चिम पट्टातील गावांतील युती शासनाच्या जलजिवन मिशन योजनेतून मंजूर पाईट,ता.खेड येथे पाणीपुरवठा योजना राबविणे या १९.७९ कोटी रकमेच्या योजनेचा भूमिपूजन समारंभ केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री मा.प्रहलाद सिंह पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.खेड तालुक्यातील उर्वरित सर्व पाणी योजनांना तातडीने निधी मंजूर केला जाईल असे यावेळी मंत्री महोदयांनी जाहीर केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला.
जलयोजनेचा भुमीपूजन करताना

यावेळी कार्यक्रमास मा खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील,आमदार माधुरीताई मिसाळ, राज्याचे संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश तात्या भेगडे, जिल्ह्याचे सरचिटणीस धर्मेंद्रजी खांडरे, जिल्हाप्रमुख भगवानशेठ पोखरकर, अतुलभाऊ देशमुख, शेखरभाऊ शेटे, स. सि. खेंगले, जे. बी. खेंगले,कल्पना गवारी,प्रिया पवार, अमृत शेवकरी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता वैशाली आवटे, उपअभियंता मनीष पवार, शाखा अभियंता श्री जगधने, तहसीलदार हर्षल सुळ, गटविकास अधिकारी अजय जोशी, पाईट गावचे उपसरपंच शारदा रामदास चोरघे, देवदास बांदल, काळुराम पिंजण यांचे सह पश्चिम पट्ट्यातील सरपंच उपसरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जलयोजनेचा मंजुर पत्र वाटप

यावेळी 100 कोटी निधीतून पिंपरी बुद्रुक -पाईट आणि नायफड-वाशेरे जिल्हा परिषद गटातील 40 ग्रामपंचायतीना जलजीवन मिशन योजनेतून योजना मंजूर केल्याची पत्रे मंत्री महोदयांच्या वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते व कार्यक्रमाचे संयोजक शरद बुट्टे पाटील यांनी केले.