प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- एसटी प्रशासनाच्या मागणीनुसार पीएमपीएमल प्रशासनाकडून ग्रामीण भागातील 11 मार्ग उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे चाकण शिक्रापुर या मार्गावरील पीएमपीएमल बससेवा उद्यापासून बंद होणार आहे. मात्र बंद करण्यात आलेल्या मार्गावरील गाड्या ज्या मार्गावर वर्दळ जास्त आहे तत्या मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कोरोना काळात एसटी सेवा बंद केल्याने व एसटी कामगारांच्या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याचा पर्यायी वापर म्हणून ग्रामीण भागातील गावांना जोडण्याऱ्या महामार्गावर पीएमपीएमल बससेवा प्रशासनाने चालू केली होती. त्यामुळे या बस सेवेचा अनेक ग्रामीण भागातील नागरिकांना फायदा झाला होता.परंतु कोरोना काळ संपल्यानंतर देखील ही बससेवा अशीच चालु राहिल्याने एसटी सेवेवर मोठा परिणाम झाला होता. ग्रामीण भागातील मार्गावर पुन्हा एसटी सेवा चालू करून देखील महाराष्ट्र परिवहन महामंडळाला तोटा सहन करावा लागत आहे. यासंदर्भात एसटी प्रशासनाने वारंवार पत्राद्वारे ग्रामीण भागातील मार्ग बंद करण्याची मागणी केली. परंतु, पीएमपीने मार्ग बंद केलेच नाहीत. शेवटी पीएमपीचे अध्यक्ष बदलले आणि ओमप्रकाश बकोरिया यांनी पीएमपी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पीएमपीतील सर्वच यंत्रणा हलली आणि नियमानुसार कामकाज सुरू झाले. बकोरिया यांच्या आदेशानुसार आता ग्रामीण भागात सुरू असलेले 40 मार्ग बंद होणार आहेत.
त्यापैकी पहिल्या टप्प्यात हे 11 मार्ग 26 तारखेपासून बंद होणार आहेत.या मागणीला प्रशासनाने दुजोरा देऊन ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएमल बससेवा 26 नोव्हेंबर 2022 पासुन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंबेठाण चौक चाकण ते शिक्रापुर पर्यत धावणारी पीएमपीएमल सेवा बंद होणार आहे. महामंडळाने पीएमपीएमल या मागणीला प्रशासनाने दुजोरा देऊन ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएमल बससेवा 26 नोव्हेंबर 2022 पासुन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आंबेठाण चौक चाकण ते शिक्रापुर पर्यत धावणारी पीएमपीएमल सेवा बंद होणार आहे.आता पुन्हा एकदा ग्रामीण भागातील नागरिकांना एसटी बससेवर अवलंबून राहावे लागणार आहे.