प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- आज लांडेवाडी येथील जनता दरबारामध्ये शिरूर तालुक्यातील शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, विभागप्रमुख, उपतालुकाप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच शिरूर तालुक्यात संघटना बांधणी अतिशय जोमाने केल्याबद्दल तालुकाप्रमुख पै.रामभाऊ सासवडे व उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद यांचे व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचे व सर्व शिवसैनिकांचे मुख्यमंत्री असून त्यांच्या कामाचा झपाटा अतिशय वेगवान आहे. शिरूर तालुक्यासह लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी त्यांनी अतिशय चांगले निर्णय घेतले होते. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी पै.रामभाऊ सासवडे यांच्या पाठीवर हात ठेवून संघटना बांधणीसाठी प्रोत्साहित केले होते.

लवकरच राज्यातील मोठ्या मंत्री महोदयांच्या व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यातील ११७ शाखांच्या नामफलकाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक व नागरिक आपल्या सोबत येत असून मुख्यमंत्री यांची विकासात्मक विचारधारा सर्वसामान्यांना आपलीशी वाटत आहे. शिरूर तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच सर्वसामान्य शिवसैनिकांना ताकद देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे केले जाईल, अशी ग्वाही यावेळी उपस्थित सर्व शिवसैनिकांना दिली.