प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- भारतीय जनता पार्टीच्या चाकण शहर अध्यक्ष (प्रभारी) पदी ॲड प्रितम अण्णा शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.भारतीय जनता पार्टीच्या चाकण येथील कार्यालयात हा पद स्विकृती समारंभ कार्यक्रम पार पडला.
चाकण येथील रहिवासी असलेले ॲड प्रितम शिंदे हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांना या आधी देखील भारतीय जनता युवा मोर्चा खेड तालुका उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टीच्या खेड तालुका संघटन सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले होते. या पदावर असताना देखील त्यांनी अनेक पक्षाची कामे पार पडली. चाकण शहर व खेड तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे काम करणाऱ्या प्रितम शिंदे यांना चाकण शहर अध्यक्ष (प्रभारी) पदी निवड करण्याचे सूतोवाच करण्यात आले. अखेर आज झालेल्या कार्यक्रमात ॲड प्रितम अण्णा शिंदे यांना चाकण शहर अध्यक्ष (प्रभारी) पदी नव्याने नियुक्ती करण्यात आले. अध्यक्ष पदाचा कालावधी संपल्यानंतर पक्ष घटनेनुसार नवीन अध्यक्ष निवडणे व तोपर्यंत प्रभारी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनेचे काम पहाणेत येणार आहे.
यावेळी कार्यक्रमावेळी खेड तालुका भाजपा अध्यक्ष शांताराम भोसले, प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा अमर बोऱ्हाडे, भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, नवीन सरचिटणीस अतुल कुऱ्हाडे, जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष मनोज मांजरे, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, युवा मोर्चाचे संदेश जाधव, मावळते शहर अध्यक्ष अजय जगनाडे, चाकण भाजपा महिला उपाध्यक्ष अरुणा पगारे, तालुका अध्यक्ष उद्योग आघाडी सूर्यकांत बारणे, योगेश देशमुख, गणेश उंबरे, जयदेवसिंग दुधानी, प्रतीक गंभीर, दत्ता परदेशी आदी यावेळी उपस्थित होते.