गुजरात निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विक्रमी विजयाबद्दल भाजपा खेड तालुक्याच्या वतीने राजगुरुनगर शहरात अतुल देशमुख व शरद बुट्टे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयात एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा दणदणीत विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सशक्त नेतृत्वावर जनतेचा विश्वास आणि प्रेमाचे प्रतिक आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, राजगुरुनगर शहराध्यक्ष बाळासाहेब कहाणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन लांडगे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अमर बोऱ्हाडे,भाजपा सरचिटणीस खेड तालुका अतुल कुऱ्हाडे, भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष राजगुरुनगर दीप्ती कुलकर्णी, उद्योजक संतोष सईद,रवीजी कारले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.