चाकण शहरात अपघात रोखण्यासाठी स्पीड ब्रेकर.

चाकण शहरात मागिल काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघाती मृत्यूची संख्या वाढत आहे. या अपघातांच्या घटना कमी करण्यासाठी चाकणकर नागरिक शासनाला वारंवार विनवणी करत आहेत. चाकण शहरातून जाणारे महामार्ग, त्यावरील उड्डाणपूल व अंतर्गत रस्ते यांची कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी चाकणमध्ये सर्वपक्षिय पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले आहेत. या विषयांसाठी अनेक बैठका, निवेदने व नेत्यांच्या भेटीचा सपाटा या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लावला आहे. तसेच १५ डिसेंबर रोजी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणार आहेत.

चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील उड्डाणपूलाचे काम लांबणीवर पडले असून चाकण तळेगाव रस्त्यावरील उड्डाणपूल देखील रखडलेला आहे. त्यातच या रस्त्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतूक कोंडीने चाकण ची दळणवळण व्यवस्था कायम तुंबलेल्या स्थितीत असते.

यांचा प्रचंड मोठा ताण अंतर्गत रस्त्यांवर येत असून चाकण आंबेठाण रस्ता हा अपघाताचे केंद्र बनलेला आहे. चाकण तळेगाव व चाकण शिक्रापुर रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच जागोजागी रस्ता दुभाजक तोडून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रयत्न केले गेले आहेत. पण हे दुभाजक तोडून तात्पुरते तयार केलेले पर्याय हे अपघाती ठिकाण ठरत आहेत.

महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समिती व चाकण शहरात जाताना तोडलेले दुभाजक हे अपघाती ठिकाण ठरले आहे. तेथील खड्डे बुजवून स्पीड ब्रेकर तयार करण्याचे काम नुकतेच पार पडले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजन परदेशी, भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, भाजपा व्यापार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, भाजपा तालुका संघटन सरचिटणीस व चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे व बाळासाहेबांची शिवसेना चाकण शहर प्रभारी संतोष हजारे यांनी सदर कामाची पहाणी केली.

जड वाहनांची वाहतूक माणिक चौक ते तळेगाव चौक अशी होती ती वळवून माणिक चौक ते मुटकेवाडी ते तळेगाव चौक केलेली आहे. यामुळे माणिक चौक ते मुटकेवाडी या मार्गावर मोठं व खोल खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यातील अशा एका खड्ड्यात ई बाईक आदळून त्यांचा अपघात झाला असल्याचे भाजपाचे खेड तालुका संघटन सरचिटणीस व चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे यांनी सांगितले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!