चाकण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केलेल्या आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. तसेच यामागील कटकारस्थान शोधून मुख्य सुत्रधार यांचाही शोध घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा कु. प्रिया नारायणराव पवार यांनी, “पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुठल्याच चुकीच्या उद्देशाने विचार व्यक्त केले नव्हते पण तरी जी शाब्दिक चुक झाली त्याची दिलगिरी व माफी देखील त्यांनी मागितली असतानाही हा झालेला प्रकार निषेधार्य आहे” असे विचार व्यक्त केले. भाजपा खेड तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे यांनी, “चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा विपर्यास करून राज्यातील शांतताभंग करण्यासाठी केलेला हा प्रकार निषेधार्य आहे” असे विचार व्यक्त केले. तसेच चाकण शहर प्रभारी अध्यक्ष व तालुका संघटन सरचिटणीस ॲड प्रितम रामदास शिंदे पा. यांनी, ” शिक्षणसम्राट हे सरकारी अनुदान व निधीवर संस्था चालवतात पण महापुरुषांनी मदतनिधी गोळा केली असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पण त्यांच्या एका शब्दावर गदारोळ निर्माण करुन महाराष्ट्रात असंतोष पसरवला जात आहे.” असे मत व्यक्त केले. निषेध झाले नंतर चाकण पोलीस स्टेशनचे पी.एस.आय.राठोड यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा कु. प्रिया नारायणराव पवार, भाजपा जेष्ठ नेते व माजी पंचायत समिती सदस्य अमृत शेवकरी, आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हा अध्यक्ष गुलाब खांडेभराड, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, युवा मोर्चा जिल्हा सचिव शाम पुसतकर, कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नाणेकर, तालुका संघटन सरचिटणीस व चाकण शहर प्रभारी अध्यक्ष ॲड प्रितम शिंदे, मा. चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे, चाकण शहर सरचिटणीस अर्जून बोऱ्हाडे, चाकण शहर उपाध्यक्ष संतोष भोज, युवा मोर्चा चाकण शहर अध्यक्ष प्रतिक गंभीर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नसिम पठाण, गणेश नाईक, मनोज देशमुख, मनोज बिस्नारे, दत्ता परदेशी यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.