भारतीय जनता पार्टी चाकण शहराच्या वतीने भाजपा जनसंपर्क कार्यालयात दिवंगत लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड यांनी दिवंगत लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी दुचाकीवर बसून चाकणमध्ये पक्षाचे काम केले. तसेच चाकणमध्ये कार्यकर्त्यांच्या घरी जेवण व मुक्काम केला. अशा अनेक प्रेरणादायी स्मृती यावेळी गुलाब खांडेभराड यांनी जाग्या केल्या. भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे यांनी देखील त्यांचे विचार व्यक्त केले. भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव यांनी सुत्रसंचलन केले.
यावेळी भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हाध्यक्ष गुलाब खांडेभराड, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मनोज मांजरे, भाजपा तालुका संघटन सरचिटणीस व चाकण शहर अध्यक्ष (प्रभारी) ॲड प्रितम शिंदे पा., भाजपा तालुका उपाध्यक्ष अनिल सोनवणे, भाजपा प्रतिभावंत आघाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरमाटे सर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदेश जाधव, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव शाम पुसतकर, भाजपा चाकण शहर उपाध्यक्ष जयदेवसिंग दुधानी, भाजपा चाकण शहर सरचिटणीस अरूण जोरी, भाजपा युवा मोर्चा चाकण शहर अध्यक्ष प्रतिक गंभिर, भाजपा उद्योग आघाडी शहर अध्यक्ष विक्रम परदेशी, भाजपा वाहतूक आघाडी चाकण शहर अध्यक्ष योगेश देशमुख, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नसिम पठाण, भाजपा युवा मोर्चा चाकण शहर उपाध्यक्ष प्रशांत शेवकरी, युवा वॉरियर्स श्रीकांत परदेशी व दत्ता परदेशी आदी उपस्थित होते.