प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण शहरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या चाकण ग्रामीण रुग्णालय अखेर प्रशासनाकडून मान्यता मिळाल्याने उपजिल्हा रुग्णालय होणार आहे.त्यामुळे चाकण औद्योगिक परिसरातील अनेक रुग्णांची सोय व उपचार या ठिकाणी होणार आहे.तसेच रुग्णालयात 100 खाटांचे वार्ड वाढणार असल्याने याचा फायदा रुग्णांना होणार आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील वाढती लोकसंख्या व परराज्यातुन आलेले नागरिकांना चाकण ग्रामीण अपुऱ्या सोयीसुविधांमुळे खाजगी रुग्णालयात जावे लागत होते. तसेच या ठिकाणी आधुनिक मशीन देखील,स्वच्छता उपलब्ध नसल्याने आलेल्या रुग्णांची हेळसांड होत होती.अनेक वेळा रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने हात हलवत परत जावे लागत होते.त्यामुळे चाकण ग्रामीण रुग्णालय आधुनिक सोयी सुविधा व उपचार देण्यात अपयशी ठरत होते.
चाकण ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय होण्याचा प्रस्ताव माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला होता. तसेच चाकण येथील गजानन महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री निलेश कड यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निर्देशानुसार प्रस्ताव सादर केला होता.परंतु सरकार बदल्याने तो प्रस्ताव प्रलंबित राहिला होता.
याची न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. या प्रस्तावाला माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना निदर्शनास आणून खेड तालुक्यावर अन्याय होत असल्याने चाकण ग्रामीण रुग्णालयात अजून 100 खाटांची विनंती केली.याची तात्काळ दखल घेत गरिबांना नेहमी साथ देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिवांना दिले.त्यानंतर पाठपुरावा केल्याने चाकण उपजिल्हा रुग्णालयाला अखेर आरोग्य विभागाकडून मान्यता देण्यात आली.चाकण येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय मंजुरी शासनाकडून मिळाल्याने चाकण पंचक्रोशीतील अनेक नागरिकांना व रुग्णांना याचा फायदा होणार आहे.