पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी शिवाजी आढळराव यांची भेटुन चर्चा

प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यात यावा यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे यांची नवी दिल्लीत शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घेतली.

पुणे-नाशिक रेल्वे मार्गाला मंजूरी मिळावी यासाठी या भागाचे लोकसभेत तीनवेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्यापासून म्हणजे सन २००४ पासून केंद्रीय पातळीपासून सर्व स्तरांवर या प्रकल्पासाठी मी कसोशीने संघर्ष करीत आलो आहे. १५ वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात जवळजवळ सर्वच अधिवेशनात या विषयी लोकसभेत आवाज उठविला आहे. त्यास सन २०१६ मध्ये यश येऊन तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पास मंजूरी दिली व कार्यान्वयासाठी ‘महारेल’कडे हा प्रकल्प हस्तांतरीत करण्यात आला.

महारेलकडून पुणे-नाशिक या २३५ किमी लांबीच्या सुमारे रू.१६०३९ कोटी रकमेच्या रेल्वे प्रकल्पाचे सेमी
हायस्पीड रेल्वेमध्ये समावेशन करण्यात आले. या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर मी व्यक्तीशः लक्ष घालून पाठपुरावा केला असून यासाठी आवश्यक २० टक्के हिस्सा खर्च करण्यास राज्य शासनाची देखील मंजूरी मिळाली आहे.

हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्र राज्यातील ऑटो हब म्हणून प्रसिध्द असलेल्या चाकण-खेड भागातील शेकडो कंपन्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील मालाची वाहतुक तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक सुलभ
होईल. पुणे-नगर-नाशिक हे तीन महत्वाचे जिल्हे एकाचवेळी जोडले जाऊन वाहतुक कोंडीचा प्रश्नही बऱ्याच अंशी सुटून नागरिकांचे जीवनमान व आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.


त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने मान्यता दिलेल्या व महाराष्ट्र शासनाने २० टक्के हिस्सा खर्च करण्यास मंजूरी दिलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्र शासनाची अंतिम मंजूरी मिळून प्रकल्प लवकरात लवकर सुरू होणेकामी सत्वर कार्यवाहीचे आदेश व्हावेत यासाठी रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रही मागणी केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!