प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील पाडळी काळेचीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या झालेल्या निवडणूकीत आज सौ शितल राजु सातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येत्या काळात गावच्या राहिलेल्या प्रश्नावर काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.
खेड तालुक्यातील पाडळी- काळेचीवाडी या ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच असलेल्या श्री संपत विष्णु बालघरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.गावच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच पद हे मोलाचे असल्याने बाकीच्या कार्यकाळ समाप्त होईपर्यंत सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असलेले बाबाजी काळे यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत चर्चा विनिमय करून सरपंच पदासाठी गावातील सौ शितल राजू सातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.बाबाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात चर्चा घडवून ग्रामपंचायत सदस्यांनी नुतन सरपंच पदाला आपला पाठींबा दर्शविला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच माधुरी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली काळे, वैभव सातकर,संपत बालघरे, सुदाम सातपुते,उज्वला सातकर, मंदा ढोरे,यांसोबत माजी सरपंच मुरलीधर भागडे,चेअरमन दत्ता सातपुते व्हाईस चेअरमन विकास बालघरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून सविता घुमटकर यांनी काम पाहिले.