प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरच्या पायथ्यालगत असलेल्या पदरवाडी येथील ग्रामस्थांनी खेड येथे पुनर्वसनाची मागणी घेऊन खेड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे .ह्या गावातील जमिनीला ६ ते ७ फुट खोल भेगा पडल्या आहेत त्या सुमारे ५०० मीटर लांब आहेत.या आमरण उपोषणाला आज खेड तालुका सखल क्रांती मोर्च्यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी मराठा क्रांती मोर्च्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांचे विचारपूस केली आहे.

माळीण सारखी ह्या गावची जमीन ही कधी ही पावसात खचू शकते अशी परिस्थिती झाली आहे .पदरवाडी गाव हे अतिधोकादायक म्हणून घोषित होऊन देखील ,शासन दरवषी पावसाळा आली की फक्त तात्पुरता स्थलांतर येथील कुटुंबीयांना करण्याचे पत्र काढते. मात्र यावर ठोस उपाय राबवत नाही, शासनाने पदरवाडी येथील ह्या १६ आदिवासी कुटुंबीयांना भीमाशंकर परिसरातील इतर ठिकाणी कायमस्वरूपी स्थलांतरित करून त्यांचे पुनर्वसन करावे , त्यांना घरे,वीज, पाणी अन्य सोयी सुविधा द्याव्यात, व त्यांचा प्रश्न हा ठोस निर्णय घेऊन सोडवावा ,अशी मागणी आमरण उपोषण कर्त्यानी केली आहे.अजून हि पावसाळा सुरू व्हायला ६ महिने अवधी बाकी आहे ,सरकार कडे वेळ आहे ,
माय बाप सरकार ने ह्या ग्रामस्थांच्या मृतांची वाट पाहून नये, वेळीच निर्णय घ्यावा.

सदर आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते, सभापती अंकुश राक्षे, शंकर राक्षे, निवृत्ती नाईकरे, शुभम बालघरे, उपसभापती विठल वांघरे, संतोष भणगे, प्रवीण पारधी, विकास भाईक आदी आंदोलनकरते उपस्थित होते.