प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे आणि शॉक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण प्रकल्पाअंतर्गत यांच्या मार्फत खेड ,चाकण विभागातील मोई, चिंबली, कुरुळी, माजगाव या गावांमध्ये महिला सक्षमीकरण यावर काम करण्यात येत आहे , त्यातील चिंबली या गावात दहा दिवसीय मेहंदी प्रशिक्षण घेण्यात आले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिला सक्षमीकरण व सबलीकरण असून विविध प्रकारच्या महिला बचत गटांना कौशल्य प्रशिक्षण देणे तसेच त्यांना उद्योग निर्मितीसाठी सहाय्य करणे हा आहे, त्याअंतर्गत चिंबळी, ता.खेड, जि. पुणे या ठिकाणी दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ते 04 डिसेंबर 2023 या कालावधीत महिलांना मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा मध्ये एकूण 26 महिलांनी सहभाग घेतला.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून सौ. वैभवी लांबकाने यांनी काम केले तसेच हॅन्ड इन हॅन्ड कडून श्री. ओंकार कुलकर्णी, सौ. सुवर्णा करपे, चिंबली गावातील बचत गटातील सदस्य उपस्थित होते. यावेळी श्री. ओंकार कुलकर्णी यांनी ग्रामपंचायत चिंबळी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचे आभार मानले.