दर्यापूर उशिरा सुरू झाले आणि मग इतर तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आज शासकीय तूर खरेदीचा आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगनीकर, बाबाराव पाटी बरवट, गजानन राव जाधव, साहेबराव भदे, प्रदीप देशमुख, अरुण पाटील गावंडे, दादाराव ढेपे, रामेश्वर चव्हाण, राजाभाऊ वानखडे, विनोद पवार, शंकर भदे, बाळासाहेब टोळे, साहेबराव बेलसरे, प्रशांत निर्मळ, प्रभाकर गहले, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्र सरकारने अत्यंत महत्वाकांक्षी अशी शेतक-यांना हमीभाव देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समित तूर या पिकाला ६३०० रूपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव जाहीर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. प्रथम शेतकरी मुकेश पाटील नळकांडे यांचा आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते दुपट्टा नारळ घेऊन सत्कार करण्यात आला व त्यांनी अकरा क्विंटल तूर मोजणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी आणावे असे आवाहन आमदार बळवंत वानखडे यांनी यावेळी केले.