दर्यापूर ग्रामीण व शहरी भागाला एकच न्याय द्या…!राष्ट्रवादी युवक काँग्रेस दर्यापूरची मागणी

दर्यापूर – महेश बुंदे

प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल बांधणीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात शहरी व ग्रामीण असा भेदभाव केलेला आहे. या योजनेत शहरी भागात अडीच लाख, तर ग्रामीण भागात दीड लाखाचे अनुदान मिळत आहे. हा भेदभाव टाळून सरसकट अडीच लाखांचे अनुदान द्यावे, शिवाय ड यादीतील ” मागेल त्याला घर ” देऊन २०२२ मध्ये सर्वांना घरे ही संकल्पना अमलात आणावी, घरकुल ड यादीतील अनेक जाचक अटी व नियम घातले आहेत,

त्यामुळे यादीतील अनेक लोकांची नावे आलेली नाही. केंद्र सरकारने याची दखल घेऊन सर्वांना घरे देण्याचा शब्द पाळावा, ड यादीतील विशेषतः ओपन, ओबीसी , कटुंबातील व्यक्तींना प्राधान्य द्यावे, तर शबरी आवास, रमाई आवास योजनेला गती देऊन मागासवर्गीय समाजालाही तात्काळ घरकुलाच लाभ घ्यावा. वरील सर्व मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली व मागणीवर कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेस हजारो लाभार्थ्यांनसह रस्त्यावर उतरले जाईल असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितिन गावंडे यांनी दिला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव संतोष शिंदे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नितिन गावंडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कपिल पोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अब्दुल शफन पटेल , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर कार्यध्यक्ष संतोष ढोकने, राष्ट्रवादी युवक चे तालुका उपाध्यक्ष योगेश पाटील हिंगणकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रतीक पाटील नाकट इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!