प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम:- जिल्हा पोलीस दलामध्ये कर्तव्यास कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मुकिंदा बापु वाघमोडे, श्री.बाळू संपती जाधवर व श्रीमती नयना शेखर पोहेकर यांची सहायक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदी मा.अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) यांचे दि.०२/०२/२०२२ रोजीच्या आदेशांन्वये पदोन्नती करण्यात आली आहे.

त्यापैकी श्री. मुकिंदा बापु वाघमोडे व श्री.बाळू संपती जाधवर यांची गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे तर श्रीमती नयना शेखर पोहेकर यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.
