लहू लांडे, खेड तालुका प्रतिनिधी
वाकी खुर्द सुंबरेनगर हद्दीतील पुणे-नाशिक हायवे वर सलग तिसरा दिवस मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. रस्त्याचा मध्यभागी असलेले ग्रेड सेपरेटर ची उंची रस्त्याच्या लेवलला आली असल्याने काही वाहनचालक ग्रेड सेपरेटर वरूनच गाडी दुस-या लेन मधी नेतात. परिणामी काळोबा महाराज माथ्यावरून (चाकण बाजुकडून) येणारी वाहणे जोरात असल्याने ब्रेक कमी लागून अपघात होतात व गाडी डिव्हायडर वर चढून दुस-र्या लेन मधील वाहनांवर आदळतात.
म्हणून नागरिकांकडून प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की ग्रेड सेपरेटर ची उंची वाढवून स्पीड ग्रेडर बसवण्यात यावे .