प्रतिनिधी लहू लांडे
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ रोजी अधिसूचित केलेल्या सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थान नियम २०२१ नुसार एकल वापर (सिंगल युज) प्लास्टिक वस्तू प्रतिबंधीत आहेत, असे चाकण नगरपरिषदेव्दारे दि. १ जुलै २०२२ पासून आवाहन करण्यात येत असून आज दि. १४/०७/२०२२ रोजी चाकण नगरपरिषदेच्या प्लास्टिक मुक्त कारवाई पथकाने मुख्याधिकारी सुनिल बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली भैरोबा मंदीर चाकण जवळ राहत्या घराखालील तळमजल्यावर सनी काकडे यांचे प्लास्टिक निर्मिती कारखान्यावर छापा टाकून ५१० किलो विक्रीसाठी तयार असलेला १०० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल जप्त करण्याची कारवाई केली.
सदर कारखाना नगरपरिषद चाकण प्लास्टिक मुक्त कारवाई पथकाने कारवाई केल्यानंतर सीलबंद केला असून मालक सनी काकडे यांचेवर प्रथम पहिला गुन्हा असल्यामुळे रक्कम रु.५०००/- (अक्षरी र.रु. पाच हजार फक्त) दंड करणेत आला आहे. यावर मुख्याधिकारी चाकण नगरपरिषद यांनी शासनाने बंदी घातलेल्या एकल वापर प्लास्टिक व इतर वस्तूंचा वापर व निर्मिती करणेत येऊ नये, असे आवाहन चाकण नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना केले.
सदरची कारवाई पथकप्रमुख राजेंद्र पांढरपट्टे, सुरज झेंडे, कविता पाटील, सुरज परदेशी, सुरेखा गोरे, मंगल गायकवाड यांचे पथकाने पोलीस बंदोबस्तात पार पाडली.