स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे-:- थोर क्रांतिकारक राजगुरू यांच्या जन्मस्थानी राजगुरूनगर येथील वाड्यामध्ये जाणीव परिवाराकडून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित दिपोत्सव आयोजित करण्यात आला होता.,त्यामुळे थोर क्रांतिकारक राजगुरू यांचा वाडा हजारो दिव्यांनी उजळून निघाला होता.डोळ्याचे पारणे फिटावे असे दिप्यमान दिव्यांची रोषणाई जाणीव परिवाराकडून करण्यात आली होती.

ज्यां थोर क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्य लढयात आपले प्राण गमावले ते भगतसिंग, सुखदेव व राजगुरू हे त्यापैकी एक. राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर या ठिकाणी वाड्यात भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिम्मित जाणीव परिवाराकडून दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जाणीव परिवाराच्या सदस्यांनी हजारो दिव्यांनी वाडा प्रज्वलित केला. एक नयमरम्य वाड्याचे रूपच उजळून निघालेले पाहायला मिळाले. तसेच वाड्यात महिलांनी सुबक अशी रांगोळी काढलेली पाहायला मिळाली. वाड्यात दिव्यांनी, रांगोळी, आणि फुलांच्या सुबकतेने वाड्याचे रूपच पालटलेले पाहायला मिळाले. एका थोर क्रांतिकारकांच्या जन्मस्थानी केलेला दीपोत्सव तालुक्यातील जनतेला नक्कीच हुतात्माची आठवण करून गेला.
