चांदूर रेल्वे शेतशिवारातील घटना
प्रतिनिधी सुभाष कोटेचा :-
चांदूर रेल्वे शेतशिवारातील कोरड्या विहीरीमधील एका अजगराला सर्पमित्र मंगल चव्हाण व सोबतच्या इतर सर्पमित्रांनी जिवनदान दिले.

चांदूर रेल्वे शेतशिवारातील अविराज खुणे त्यांच्या शेतातील 50 फुट खोल असलेल्या कोरड्या विहिरी मध्ये जवळपास पाच ते सहा फूट अजगर जातीचा साप असल्याची माहिती सर्पमित्रांना देण्यात आली. सर्पमित्र मंगलसिंग चव्हाण, प्रशांत गावंडे, राहुल राऊत, गोपाल शिंपी, बासलापुर येथील सर्पमित्र शिवाजी चर्जन, सुभाष खेरडे, यशवंत तायडे, सुरेश तायडे, दिलीप कुंजकर, अक्षय चौधरी, विशाल माने हे सदर ठिकाणी पोहचले होते. सर्पमित्र हे शिडीच्या सहाय्याने सदर कोरड्या विहीरीत उतरले व या अजगर ला पकडले. सदर अजगराला चिरोडी वनविभाग या क्षेत्रामध्ये शुक्रवारी सकाळी सोडण्यात आले. या सर्पमित्रांमुळे सदर अजगराचा जिव वाचला.
