चांदूर रेल्वे – सुभाष कोटेचा
यंदा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. कारण आयटीआय नंतर लगेच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. अशातच चांदूर रेल्वे आयटीआय मधील उत्तीर्ण झालेल्य 98 प्रशिक्षणार्थींची पियाजियो या कंपनीमध्ये निवड झाली आहे.

पियाजिओ व्हेईकल प्रायव्हेट लिमिटेड, बारामती या कंपनीचे कर्मचारी चांदूर रेल्वे येथे आयटीआय मध्ये आले होते. यावेळी त्यांनी 114 प्रशिक्षणार्थींची मुलाखत घेतली व 98 प्रशिक्षणार्थ्यांची निवड केली. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेश शेळके, गटनिदेशक के. एस. शहाडे तसेच इतर निदेशक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
