Post Views: 672
दर्यापूर – प्रतिनिधी महेश बुंदे :-
भारतीय स्टेट बँकेकडून आपल्या ग्राहकांना प्रत्यक्ष शाखा, ऑनलाईन आणि डिजिटल अॅप्लिकेशन अशा विविध माध्यमातून सेवा पुरवल्या जातात. आज घडीला एस.बी.आय (SBI) ही देशात सर्वाधिक शाखा असणाऱ्या बँकांपैकी एक आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी SBI कडून अनेक ठिकाणी ग्राहक सेवा केंद्र (Custome Service Point) तयार करण्यात आली आहेत.
त्यापैकी एक म्हणजे दर्यापूर येथील SBI बँक कडून सुद्धा ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ग्राहक सेवा केंद्र बँक परिसरात उभारले गेले, त्या ठिकाणी ग्राहक सेवा केंद्रांमार्फत दहा हजार रुपये काढणे व २० हजार रुपये भरण्याच्या सुविधेसह अनेक जलद सेवा उपलब्ध आहे. कोविड – १९ च्या काळात सुद्धा हा स्तुत्य उपक्रम नित्यदायी स्वरूपाचा ठरला आहे, या ग्राहक सेवा केंद्रांचा वापर केल्यास गैरसोय होणार नसल्याचे मत ग्राहक सेवा केंद्राचे संचालक सौ. स्वाती कोळमकर यांनी केले आहे.