प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:- एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव असलेल्या वरुड तोफा गावातील नातेवाईक अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.
समिर वानखडे यांच्या समर्थनार्थ एकञ येत वाशिम शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला हार घालुन चौकातुन निषेध मोर्चा काढन्यात आला.

त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशनमध्ये अट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
