Post Views: 427
दुदैवी घटना;पोटच्या मुलानेच बापाला संपवल्याचा थरार, माझं लग्न का करून देत नाही ? म्हणून पोटच्या पोराने बापाला कुऱ्हाडीने वार करून संपवले !
प्रतिनिधी फुलचंद भगत :-
वाशिम:-पोटच्या मुलानेच बापाला संपवल्याचा थरार वाशिम जिल्ह्यात घडला आहे.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. माझे लग्न का करून देत नाहीत ? म्हणून मुलाने पित्याची कुऱ्हाडीने निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे.
तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत जऊळका गावातील प्रमोद धर्मा भारती (वय २७) काल (दि.५)सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान त्याचे वडील धर्मा भारती (वय ६५) यांच्याशी माझे लग्न का करून देत नाही म्हणून वाद घातला. दरम्यान त्याने लोखंडी कुर्हाडीने डोक्यात व पायावर वार करून गंभीर जखमी केले.याबाबतची फिर्याद मृतकाची सून संजीवनी महादेव भारतीने जऊळका पोलीस स्टेशनला दिली.
त्यावरून पोलिसांनी गंभीर जखमी धर्मा यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान धर्मा भारती यांचा रात्री दोन वाजता मृत्यू झाला. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला तत्काळ अटक केली. पुढील तपास ठाणेदार आजिनाथ मोरे व सहकारी करीत आहेत.