अकोला: प्रतिनिधी प्रेमकुमार गवई
मुर्तिजापूर तालुक्यातील दताळा ते भटोरी रस्त्यावर गाळ साचल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मोटर सायकलस्वारांची जिवीत हानी होण्याची शक्यता होती. तसेच दताळा येथे इयत्ता पाचवी पर्यंत शाळा असल्याच्या कारणाने भटोरी येथे इयत्ता दहावी पर्यंत शाळा असल्याने पायदळ येणे जाणे लहान चिमुकल्यांना करावी लागते. या रस्त्याने जाणे म्हणजे जीवघेणा रस्ता अशी ओळख झाली होती.
सामाजिक कार्यकर्ते संभादादा खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्रकार प्रेमकुमार गवई यांनी त्या ठिकाणी जाऊन बातमी लावली. गावचे पोलीस पाटील यांनी प्रतिक्रिया देत ताबोडतोब प्रशासनाने लक्ष द्यावे अशी केली विंनती. याच विंनती चा मान राखून जिल्हा परिषद सदस्य, बांधकाम सभापती सम्राट डोंगरदिवे यांनी स्व खर्चातून केले ताबोडतोब केले काम. यावेळी सर्व ग्रामवासी उपस्थीत होते.
संभा खांडेकर, रोहित सगणे, अजय गायकवाड, निखील खांडेकर, मंगेश खांडेकर, संदिप खांडेकर, आकाश खांडेकर, संजुभाऊ खांडेकर, अनिल खांडेकर, आकाश नाईक, निलेश बावनकर, शुभम कावरे, सोनु खडे, शैलेश बागडे, जिवन वानखडे, बंन्टी सिरसाट, अमोल मालटे, अजय नंन्दे, राहुल खांडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.