खेड तालुका प्रतिनिधी – लहू लांडे.
दि. १०/०७/२०२२ रोजी पहाटे ०५/०० वा. चे सुमारास चाकण पोलीसांना नाशिक पुणे महामार्गावरून पुणे येथे अवैधरित्या गुटख्याचा टॅम्पो जाणार असल्याची गोपनीय बातमीदार यांचेडुन माहिती मिळाली, चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी अधिकारी व अंमलदार यांना बातमीची खात्री करून कायदेशिर कारवाई करण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले.
त्यावरून चाकण पोलीसांनी मिळालेल्या माहितीचे आधारे वाकी खु॥ परिसरात नाशिक पुणे महामार्गावरील रोहकल फाटयाचे रिपड ब्रेकर जवळ सापळा रचुन टाटा कंपनीचा टॅम्पो क एम एच २२ ए ए १७१० याचेवर छापा टाकुन सदर टॅम्पोची तपासणी केली असता सदर टॅम्पो मध्ये आरएमडी पान मसाला व एम सुगंधी तंबाखु असलेला एकुण ९१,२०,०००/- रूपये किंमतीचा गुटख्याचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला माल मिळुन आला आहे. सदरचा गुटखा व वाहतुक करण्यासाठी वापरलेला टाटा कंपनीचा टॅम्पो क्र एम एच २२ ए ए १७१० असा एकुण १,०१,२०,०००/- ( एक कोटी एक लाख विस हजार रुपये ) किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला असुन सदर माल वाहतुक करणारा आरोपी नामे गणेश विठठल भाडळे वय ३२ वर्षे, रा. कोयाळी ता. खेड जि. पुणे यास अटक करण्यात आलेली असुन त्याचे विरोधात चाकण पोलीस स्टेशन गुरनं १११५ / २०२२ भादवि कलम ३२८, २७२,२७३, १८८, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास चालू आहे.सदरची कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ मंचक इप्पर, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक अनिल देवडे, सपोनि प्रसंन्न ज-हाड, सपोनि विक्रम गायवाड, पोसई निलेश चव्हाण, सफौ सुरेश हिंगे, पोहवा संदिप सोनवणे, पोना भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, निखील शेटे, पोकॉ चेतन गायकर, नितीन गुंजाळ, प्रदिप राळे, निखील वर्पे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.