
शनिवार , दिनांक 09 जुलै 2022 रोजी श्री भैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे, नवमहाराष्ट्र विद्यालय रुपीनगर मध्ये आषाढी वारी निमित्ताने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे सचिव किशोर आनंदराव गौंड.(सर) यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. तसेच ज्ञानेश्वर माऊली तुकाराम यांचा जयघोष करून पालखी रुपीनगर परिसरात मिरवणूक काढण्यासाठी मार्गस्थ करण्यात आली.

रुपीनगर येथील रामेश्वर मंदिर चौकात पालखीचे गोल रिंगण करण्यात आले. या रिंगण सोहळ्यात शाळेतील चिमुकल्या वारकऱ्यांनी तसेच शिक्षकांनी सहभाग घेतला.पालखी रिंगण पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी खूप गर्दी केली.तसेच मुलांना रुपीनगर परिसरातील नागरिकांनी खाऊ वाटप केले.पालखी पुन्हा शाळेत आल्यानंतर पालखी रिंगण करून सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अशिष गौंड (सर) , प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमलता वाघ मॅडम् , माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमलता कोकणे मॅडम् , तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते . शाळेचे माध्यमिक विभागाचे शिक्षक राम गावडे (सर) यांच्या हस्ते खाऊ वाटप करून पालखी सोहळा समाप्त करण्यात आला.

