वार्ताहर: चाकण
दि. 2 जुलै
मुलांनी आरोग्यासाठी पौष्टिक आहार घ्या – डॉ. समीक्षा चोरडिया

स्वतः च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोज सकस आणि पौष्टिक आहार घ्या, रोजच्या जेवजात चपाती, भाकरी, डाळ – भात, सर्व कडधान्य, सर्व पालेभाजी, फ्रुट सॅलड इत्यादी मुलांनी खाल्लेच पाहिजे. रोज स्वतःची स्वच्छता ठेवा, हात साबणाने धुवा, रोज 8 तास झोप घ्या. रोज व्यायाम करा. या आणि अशा अनेक प्रकारच्या टिप्स डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज ,पिंपरीच्या आहारतज्ज्ञ डॉ. समीक्षा चोरडिया यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी संवाद साधला.
चाकण येथील विश्वशांतीनिकेतन विद्यालय आणि संतोष ऑल राऊंडर अँकॅडमी येथे राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी डॉक्टरांच्या वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांनी डॉक्टर दिनाची माहिती सांगितली, विद्यार्थ्यांनी भाषणे केली.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. औदुंबर अतुल मंडलिक या विद्यार्थ्यांने विद्यालयाला प्रथोमोपचार पेटी भेट दिली. स्वागत, सत्कार आणि प्रस्तावित प्राचार्या अर्चना प्रविण आघाव यांनी केले, आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन सौ. पल्लवी पवार यांनी केले.
