चाकण मार्केटमध्ये बकरी ईद निमित्त जनावरांचा आठवडे बाजार येत्या बुधवारी पुन्हा जादा भरवला जाणार

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

पुणे :- चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या आठवडे बाजार हा येणाऱ्या बकरी ईद सणानिम्मित येत्या बुधवारी पुन्हा शेतकरी बांधव,व्यापारी, खरेदीदार जादा भरवला जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे ही बुधवारी देखील बाजारात घेऊन येण्याचे आवाहन मार्केट कमिटीकडून करण्यात आले आहे.

जुलै महिन्यातील येत्या 10 तारखेला बकरी ईद सण जवळ आल्याने येत्या बुधवारी दिनांक 6 जुलै 2022 रोजी जादा बाजार भरवला जाणार आहे.चाकणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळत असते. तालुक्यातील व बाहेरील अनेक शेतकरी, व्यापारी आपल्या शेळ्या,मेंढ्या,व जनावरे बाजारात घेऊन येत असतात. त्यामुळे चाकणच्या कृषी उत्पन्न बाजारात शेळ्या मेंढ्याना चांगली किंमत मिळत असते.तसेच चाकण कृषी उत्त्पन्न बाजार समितीचा आठवडे बाजार हा दर शनिवारी भरवला जातो. अनेक शेतकरी आपला भाजीपाला,कांदे,बटाटे,जनावरे घेऊन येत असतात.परराज्यातून देखील या ठिकाणी भाजीपाला बाजारात वेगवेगळ्या भाजीची मोठी आवक होत असते. त्यामुळे येथील आठवडे बाजाराची देखील मोठी उलाढाल पाहायला मिळते.

बकरी ईद सणानिम्मिताने येत्या बुधवारी जनावरांचा पुन्हा जादा बाजार भरवला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी,व्यापारी वर्गानी सहभागी होऊन आपले जनावरे घेऊन येऊन सामील होण्याचे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!