राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शपथ

स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे

मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनात शपथ घेतली. यावेळी शपथविधी झालेल्या सोहळ्यात अनेक भारतीय जनता पार्टीचे व शिंदे गटाचे आमदार,खासदार, राज्यपाल उपस्थित होते.

महाराष्ट्रात गेल्या 10 व 15 दिवसांपासून अनेक राजकीय नाट्य रंगले होते. जनतेला देखील नक्की महाराष्ट्रात काय चाललंय आणि काय होणार याचा प्रश्न पडला होता. त्यातच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त करून त्याच्याविरुद्ध बंड पुकारले होते.

त्या बंडामध्ये मुख्य भूमिका असणारे एकनाथ शिंदे हे देखील बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेला पाठींबा देणारे असल्याने शिवसेना आमदारांनी केलेला बंड हा देशभर गाजला होता. मात्र अनेक राजकीय घडामोडींनंतर आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व हिंदुत्ववादी आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन यावर पडदा टाकला.

आज राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी यावेळी शपथ दिली. त्यामुळे आज नक्कीच महाराष्ट्राला हिंदुत्ववादी विचारांचा मराठी माणूस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!