शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळून आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील अनेक भागात बंडखोर आमदार व त्यांच्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पक्षाच्या सुचनेनुसार आंदोलने करण्यात येत आहेत. त्यानुसार खेड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी चाकण येथे नुकतेच निषेध आंदोलन करण्यात आले.
चाकण पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील माणिक चौक, चाकण याठिकाणी ०३.१५ वा चे सुमारास रामदास धनवटे- शिवसेना खेड तालुका अध्यक्ष, अशोक खांडेभराड- प्रवक्ते शिवसेना खेड तालुका, किरण मांजरे- माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माझी उपजिल्हाप्रमुख शिवसेना, पांडुरंग गोरे- शिवसेना शहर संघटक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे गटाने बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन झाले व शांततेत समाप्त झाले. यावेळी ५०-६० एवढा शिवसैनिकांचा जनसमुदाय उपस्थित होता.
सदर वेळी चाकण पोलीस स्टेशन कडून योग्य तो पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता.