पावसाळा सुरू झाला आहे सावधान…
निसर्गचक्र राखण्यासाठी सापांना मारू नका, सर्पमित्रांना बोलवा.
पावसाचे पाणी बिळात गेल्याने बिळातील साप जीव वाचवण्यासाठी बाहेर येतात, पर्यायाने अनेक साप मानवी वस्तीत भक्ष व निवारा शोधण्यासाठी मानवी वस्तीत येतात. त्यातूनच सर्पदंशाच्या घटना घडतात. सर्पदंश होण्याचे प्रमाण पावसाळ्यात अधिक आहे. सर्पदंश टाळण्यासाठी खालील मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे.
काय काळजी घ्याल ?
रात्री जमिनीवर न झोपता कॉट किंवा बाजेवर झोपावे.
● घराजवळ पालापाचोळा, कचऱ्याचे ढीग, दगड विटांचे ढीग, वाळलेले सरपणचा साठा करू
नये.
घराजवळ खिडकी दरवाजाला लागून झाडाच्या फांद्या येणार नाहीत याची दक्षता घेणे.
• सरपण व गोवऱ्या घरालगत न ठेवता काही अंतरावर पण जमिनी पासून उंचीवर ठेवा. • चालताना पायात बूट घाला, शेतात काम करताना गवतात एकदम हात घालू नका, जिथे काम करायचे तिथे आधी मातीचे लहान ढेकळे फेकून, तसेच काठी जमिनीवर आपटून काम करावे.
• अंधारात जाताना नेहमी हातात टॉर्च बाळगावी.
• घराच्या परिसरात गवत वाढून देऊ नका.
● आपल्या घराच्या परिसरात साप निघाल्यास जवळ जाऊ नका स्वतः पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. सर्पमित्रांना कळवावे.
• सर्पमित्र येईपर्यंत त्या सापावर लक्ष ठेवावे, श्यक्य असल्यास लांबून फोटो घ्यावे.
• रात्री शूज किंवा चप्पल उंच ठिकाणी ठेवावे.
● घराजवळ नेहमी स्वछता ठेवावी.
सर्पमित्र गणेश टिळे कर (अध्यक्ष, महा. राज्य) ९९६०५१६३६६, ९७६३५१६३६६