स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण येथील तळेगाव चौकात पहिल्याच पावसात तळे साचल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. त्यातच या ठिकाणी असलेले मोठे खड्डे हे साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना दिसत नसून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
तळेगाव चाकण शिक्रापूरकडे जाणारी अवजड वाहने, व पुणे नाशिक हा राज्य महामार्ग चाकणच्या मुख्य चौकातून जात असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यातच या ठिकाणी पडलेले मोठे खड्डे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पहिल्याच पावसाने या ठिकाणी मोठे तळे साचले असुन वाहनचालक जीव मुठीत घेऊन पाण्यातून वाट काढत आहेत. तसेच या साचलेल्या पाण्याला दुसरीकडे जायला जागाच नसल्याने व शेजारील गटारे तुंबल्याने मोठे तळे साचून राहिले आहे.जी कामे पावसाळ्यापुर्वी होयला पाहिजे होती ती न झाल्याने आता नागरिकांचा जीव गेल्यावर व मोठा अपघात घडल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार का?? असा प्रश्न चाकणकर विचारत आहेत