तहसीलदार यांना एक ते दोन महिन्यांची उत्पन्न दाखल्याची मुदत वाढवून द्यावी यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे, दत्तात्रय भालेकर, मच्छिंद्र धनवे, रामदास जैद आदी उपस्थित होते.
तहसीलदार यांनी एक ते दोन महिन्यांची उत्पन्न दाखल्याची मुदत वाढवून दिली. अपंग व इतर समस्यांसाठी खेड तालुक्यात प्रहार अपंग क्रांती आंदोलन ही संघटना काम करीत आहे. निवेदन दिल्यानंतर तहसीलदार यांनी मागणी मान्य केली म्हणून प्रहार अपंग क्रांती आंदोलन यांचेकडून तहसीलदारांचे अभिनंदन करण्यात आले.