
स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- चाकण जवळील अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रासे गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोल लोंबल्याने व गावातील अनेक विद्युत तारांना झाडाचा विळखा पडल्याने व लटकलेल्या तारांमुळे नागरीकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील महावितरण कंपनीचा आंधळा कारभार हा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

चाकण औद्योगिक करणामुळे पंचक्रोशीतील गावांचा जसा झपाट्याने विकास झाला, तसा शेजारील गावातील लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत गेली आहे. अनेक परराज्यातील,महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आलेल्या नागरिकांनी या ठिकाणी वास्तव्य केले आहे. त्यामुळे शेजारच्या गावात अनेक नव्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. परिणामी गावात असलेल्या जुन्या विद्युत ट्रान्सफॉर्मर वर दाब येऊन अनेक वेळा बंद पडल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे गावातील विद्युत ट्रान्सफॉर्मर वाढत गेले व विद्युत तारांचे जाळे देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे.

मात्र चाकण जवळच असलेल्या रासे या गावातील देखील मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत पोल हे लोंबल्याने व गावातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांचा विळखा विद्युत तारांना पडल्याने पायी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच गावातील अनेक विद्युत पोलवरच्या तारा ह्या लटकलेल्या अवस्थेत आहेत. आता लवकरच पावसाळा सुरवात होणार असल्याने जी कामे पावसाळ्यापुर्वी महावितरण कर्मचाऱ्याने गावात करायला पाहिजे होती ती न केल्याने आता नागरिकांचा जीव गेल्यावर महावितरण कंपनी जागे होणार का?? असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे.
त्यामुळे अशा कामकुचार महावितरण कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. त्यातच हा गावातील कर्मचारी चाकण महावितरण कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याने नक्की कोणाचा आशिर्वाद त्याला पाठीशी घालतोय हे देखील गावकऱ्यांना कोडे पडले आहे.
मध्यंतरी या कामकुचार कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे गावातील विद्युत ट्रासफार्मरवर विद्युतदाब वाढल्याने गावातील नागरिकांचे घरातील, टीव्ही, बल्ब,व विद्युत उपकरणांचे नुकसान झाले होते.यामुळे अशा कामकुचार कर्मचाऱ्याला कोणी सत्ताधारी व विरोधकांनी गावातील नागरिकांनी समर्थन करू नये.आणि ज्यांना त्याचे समर्थन करायचे असेल तर गावातील नागरिकांचे झालेली नुकसान भरपाई त्यांनी द्यावी असा सूर गावातील नागरिकांनी लावला आहे.
रासे गावातील शेतकऱ्यांची, नागरिकांची विद्युत बिले ही वेळोवेळी वसूल केली जातात. परंतु काही समस्या निर्माण झाली की गावातील कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याचे गावात नव्याने वास्तव्यास आलेल्या नागरिकांमधुन बोलेले जात आहेत. तसेच काम लवकर होण्यासाठी चिरीमिरी देखील हा कर्मचारी घेत असल्याचे कानावर आले आहे. त्यामुळे अशा कामकुचार कर्मचाऱ्यावर महावितरण विभागाकडून काय कारवाई होणार…का गावातील नागरिकांच्या जीवाशी महावितरण खेळत राहणार हेच पहावे लागेल.
